नाशिककरांनो आता पाणीटंचाईलाही तोंड द्यावे लागणार…

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना संकटसोबतच आता नाशिकरांना पाणीटंचाईला देखील द्यावे लागणार तोंड द्यावे लागणार आहे असे चित्र आहे. सध्या फक्त 38 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातदेखील फक्त 45 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात पाणीकपात लागू करण्याचे संकेत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.