रविवारच्या (दि. २७ जून) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी…

उद्याच्या (दि. २७ जून) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग रविवार दि :२७-०६-२०२१  रोजी मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार आहे. नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : २७-०६-२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. महत्वाचे: येत्या सोमवार पासून निर्बंधांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. याआधी मॉल्स सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र सोमवार पासून तर पुढील आदेश येईपर्यंत मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.