नाशिक शहर: गुरुवारच्या (दि. ८ जुलै) लसीकरणाबाबत अतिशय महत्वाची बातमी…

नाशिक शहर: गुरुवारच्या (दि. ८ जुलै) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. ८ जुलै २०२१) मनपा हद्दीतील सर्व केंद्रांवर कोविशिल्ड लसीकरण बंद राहणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी दि. ८ जुलै २०२१ रोजी इंदिरा गांधी हॉस्पिटल (पंचवटी, नाशिक) आणि इएसआयएस हॉस्पिटल (सातपूर) येथे कोवॅक्सीनचा पहिला आणि दुसरा डोस (१८ वर्ष आणि पुढे) मिळणार आहे. याबाबत सर्व नाशिकच्या नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. बुधवारी कोरोनासोबतच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.  पावसाळा सुरू झाला नाही तोच शहरात वाढत्या डासांच्या साम्राज्यामुळे डेंग्यू व चिकुनगुनियासारख्या आजारांनी डोके वर काढले असून चिकुनगुनियाचे ८५ तर डेंग्यूचे ८८ रुग्ण आढळले आहेत.