नाशिक शहरात रविवारच्या (दि. ३० मे) लसीकरणाबद्दल महत्वाची बातमी..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील लसीकरणाबाबत महापालिकेने महत्वाची सूचना दिली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीप्रमाणे उद्या रविवार दिनांक : ३० मे२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सोमवारच्या लसीकरणाची माहिती रविवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.