नाशिकमध्ये सुरु असलेल्या लसीकरणाबाबत महत्वाची बातमी…

नाशिक (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या नव्याने  आलेल्या आदेशानुसार दिनांक १५ मे २०२१ पासून नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आता कोविशील्ड या लस  चा पहिला डोस घेतल्या नंतर दुसरा डोस घेण्याचा  कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केलेला आहे.

१५ मे २०२१  या तारखेच्या आधी कोविशील्ड  लसचा पहिला डोस  घेतलेल्या  नागरिकांना आता ८४ दिवस झाल्यानंतरच दुसरा डोस मिळणार आहे.

शनिवार १५ मे पासून ज्या नागरिकांचे कोविशील्ड या लसचे पहिला  डोस  घेऊन ८४  दिवस पूर्ण झालेले  असतील अश्याच नागरिकांना कोविशील्ड लसचा दुसरा डोस मिळणार आहे. तसेच कोवॅक्सिन  या लसचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे अंतर पूर्वी प्रमाणे २८ ते ४२ दिवसच राहील. तरी ज्या नागरिकांचे  कोविशील्ड या लसचे ८४ दिवस  पूर्ण झालेले नसतील अश्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये असे आवाहन नाशिक महानगरपालिका प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.