नाशिक शहरात बुधवारी (दि. 22 जुलै) पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढली; 5 जणांचा कोरोनाने मृत्यू

नाशिक शहरात बुधवारी (दि. २२ जुलै) २८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. २२ जुलै) तब्बल २८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २६४, एकूण कोरोना रुग्ण:-६३५६, एकूण मृत्यू:-२२१(आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :- ४६००, उपचार घेत असलेले रुग्ण:- १५३५ अशी संख्या झाली आहे. !

सदर बातमी प्रसिद्ध करेपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त झाली नव्हती.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती..:
१) बिडी कामगार नगर,अमृतधाम नाशिक येथील ७९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) घर नंबर ६२, आंबेडकर नगर, नाशिक येथील ५६ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३)भद्रकाली, नाशिक येथील ५० वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ४) घर नंबर ३९८६,काझी गल्ली,कुंभारवाडा,जुने नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) शिवाजी चौक, सिडको, नाशिक येथील ८२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.