नाशिक शहरात बुधवारी (दि.12 ऑगस्ट) 484 पॉझिटिव्ह; 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि.१२ ऑगस्ट) तब्बल ४८४ पॉझिटिव्ह एकूण रुग्ण आढळून आले आहेत तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १२५५, एकूण कोरोना रुग्ण:-१४८११, एकूण मृत्यू:-३७१ (आजचे मृत्यू ०९), घरी सोडलेले रुग्ण :- ११,२०२, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३२३८ अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरात बुधवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या परिसरनिहाय यादीसाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) पारिजात नगर, कॉलेज रोड येथील ८३ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) तळेनगर,रामवाडी पंचवटी येथील ६४ वर्षीय वृद्ध महिलेची निधन झालेले आहे. ३) तारवाला नगर, मेरी येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) किस्मत लॉन्स, पखाल रोड येथील ५६ वर्षीय महिलेची निधन झालेले आहे. ५) पाथर्डी फाटा,नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध महिलेची निधन झालेले आहे. ६) रेणुका नगर, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) काळाराम मंदिर येथील ५१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) अशोक नगर, सातपूर येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) राधा रेसिडेन्सी, नाशिक येथील  ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.