पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विश्वास नांगरे पाटील हे मुंबईला बदली घेण्यासाठी उत्सुक असल्याचीही पोलीस खात्यात चर्चा सुरु होती. शुक्रवारी कोरोनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीला पोलीस आयुक्त अनुपस्थित होते. ते मुंबईला तळ ठोकून असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता या बदलीच्या चर्चेला उधाण आले आहे.