नाशिक शहरात गुरुवारी (28 मे 2020) आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

नाशिक शहरात गुरुवारी आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (२८ मे २०२०) आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री आपण जाणून घेऊया ! विसे मळा येथील मयत पोलीस कर्मचारी यांच्या संपर्कातील  एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले असून  त्यात  २६ वर्षीय युवक ५३ व्यक्ती बरोबरच २३ व २५ वर्षीय युवतीसह ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पखाल रोड येथील मयत वृद्धाच्या संपर्कातील २ वर्षीय  बालिकेचा अहवाल करून कोरोना बाधित आला आहे.

दूध बाजार परिसरातील ३० वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.

नाईकवाडी पुरा येथील रुग्णाच्या संपर्कातील परिसरातील ५४ पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जत्रा हॉटेल येथील परिसरातील रुग्णाच्या संपर्कातील ३३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

दत्त मंदिर नाशिकरोड परिसरातील रूग्णाच्या संपर्कातील ३९ वर्षीय महिला व १५ वर्षीय युवक कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

मुमताज नगर वडाळा येथील रुग्णाच्या संपर्कातील १० वर्षीय मुलगी ही कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

रथचक्र हाऊसिंग सोसायटी इंदिरानगर परिसरातील ३२ वर्षीय व्यक्तीला थंडी ताप सर्दी-पडशाचा त्रास होत असल्याने तो अशोका हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाला होता त्याचा तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. असे एकूण आत्ताच्या अहवालात १३ पैकी ७ पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे.