नाशिककर मास्क वापरताय पण हेल्मेट नाही

नाशिक (प्रतिनिधी) : अनलॉक टप्पा सुरु झाल्यापासून शहरात वाहतूक सुद्धा बऱ्यापैकी सुरु झाली आहे. पण जसे लॉक डाऊनच्या आधीच्या काळात शहरात क्वचितच लोकं विना हेल्मेट गाडी चालवतांना दिसायचे तिथे लॉक डाऊन नंतरच्या काळात याउलट परिस्थिती बघायला मिळतेय. क्वचितच लोकं हेल्मेट घालून गाडी चालवतांना दिसताय.

गेल्या दोन ते तीन महिन्यांत लॉक डाऊन घोषित केला तेव्हापासून वेगवेगळ्या मास्कचा ट्रेंडच सुरु झालाय. जे वाहतूक पोलीस हेल्मेट सक्ती करायचे, हेल्मेट नसल्यास दंड आकारायचे, तेच पोलीस या लॉक डाऊनच्या काळात मास्क न वापरणाऱ्या लोकांवर कारवाई करतांना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु आता लॉक डाऊन संपून अनलॉक टप्पा सुरु झालाय. जनजीवन पुन्हा एकदा सुरळित व्हावं यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जसं आपण मास्क वापरतोय तसाच हेल्मेटही वापरणं आवश्यक आहे.