नाशिक शहरातल्या थत्ते नगर येथे एक व्यक्ती पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मधील थत्ते नगर येथे आज (दि. २० मे २०२०) एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण मुंबईहून आल्याचे समजते. खबरदारी म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने  रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना क्वारंटाइन केले असून थत्ते नगर परिसर सील करण्यात आला आहे.  आढळून आलेल्या रुग्णाची प्रकृती बरी नसल्याने नाशिकमधील खासगी  रुग्णालयात त्याचावर उपचार चालू होते.

कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने या रुग्णाचे घशाचे नमुने घेण्यात आले होते, बुधवारी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गंगापूर रोड येथील थत्ते नगर एचडीएफसी बँक जवळील एका बिल्डिंग मध्ये रुग्णाचे नातेवाईक वास्तव्यास आहेत. या रुग्णाच्या संपर्कात कोण-कोण आले आहे याची आता आरोग्य विभागाकडून चौकशी केली जात आहे.