नाशिक शहरात रविवारी रात्री उशिरा आढळून आलेल्या 49 रुग्णांची हिस्ट्री आणि माहिती

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि.7 जुन) रात्री उशिरा आढळून आल्या कोरोनाबधितांची हिस्ट्री जाणून घेऊ या…जयदीप नगर, वडाळा येथील ५८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.नाईकवाडी पुरा येथील २२ वर्षीय युवती,३२ वर्षीय पुरुष ,११ वर्षीय मुलगा,४५ वर्षीय महिला,११वर्षीय मुलगा व १६ वर्षीय युवक यांचा कोरोना बाधीत अहवाल प्राप्त झालेला आहे.हे सर्वजण एकाच परिसरातील असून त्यातील काही जण एकाच कुटुंबातील आहेत व जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
दिंडोरी रोड मायको दवाखाना गल्ली नंबर ९ येथील जुन्या रुग्णांच्या संपर्कातील ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

भगवतीनगर हिरावाडी येथील एकाच कुटुंबातील २१ वर्षीय युवक व ३३ वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
भराड वाडी पेठरोड येथील २० वर्षीय युवती व ६ महिन्यांची बालिका हे एकाच कुटुंबातील असून जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत त्यांचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
राजरत्न नगर सिडको येथील १६ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
राधिका निवास स्नेह नगर येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोना बाधित अहवाल प्राप्त झाला असून त्यात २५ व २३ वर्षीय युवतीसह ३ वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

गुलशन कॉलनी पखाल रोड प्लॉट क्रमांक २१ एकाच परिसरातील रहिवासी असून त्यात ६९ वर्षे वृद्ध,६२ वर्षीय वृद्ध महिला,३८ वर्षीय पुरुष,३४ वर्षीय महिला,५३ वर्षीय वृद्ध महिला, २१ वर्षीय युवक १५ वर्षीय मुलगी, यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेला आहे.हे सर्व जण जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
सिल्वर पार्क,काठे गल्ली गणेश नगर येथील ३२ वर्षीय महिला व १५ वर्षीय मुलगा हे एकाच कुटुंबातील असून ते कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
राजरत्न नगर सिडको येथील ४० वर्षीय पुरुष याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
आनंद छाया बिल्डींग, आनंद छाया बस स्टॉप, सातपूर कॉलनी येथील ५४ वर्षीय महिला २५वर्षीय महिला हे एकाच परिवारातील असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर याच परिसरातील रहिवाशी ४८ वर्षीय महिला, ३५ वर्षीय महिला व ६ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
शिवशक्ती चौक सिडको येथील ४० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
खोली क्रमांक ३५, जाधव संकुल, सातपूर येथील १६ वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

घर नंबर ३७११, भगवान पुरा येथील ५८ वर्षीय वृद्धाचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
अशोका मार्ग येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
नाईकवाडी पुरा, काझी चौक येथील ४८ वर्षीय व्यक्ती व २७ वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
स्वस्तिक नगर पखाल रोड येथील ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
घर नंबर ४६०८, नाईकवाडी पुरा,जुने नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिला,१८वर्षीय व २० वर्षीय युवक,३५ व ३२ वर्षीय महिला,३३वर्षीय पुरुष,३०वर्षीय महिला,१३ वर्षीय मुलगी,११ वर्षीय मुलगी, ३३वर्षीय महिला,३० वर्षीय व्यक्तीचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.