नाशिककरांना आता मिळणार स्पुटनिक लस !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे पुरेसे डोस उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे महापालिकेने लस स्वत: खरेदी करून नागरिकांना उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार सध्या पाच लाख रशियन “स्पुटनिक” लस खरेदीवर नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शिक्कामोर्तब केलंय. सोमवारी (दि. २४ मे) तसे पत्र जाधव यांनी वितरकाला दिले आहे. त्यामुळे आता नाशिकरांना रशियन लस मिळण्याची शक्यता आहे.