दुष्काळात तेरावा महिना : नाशिकच्या शाळांनी फी वाढवली…

नाशिक(प्रतिनिधी): शासनाकडून सर्व व्यव्स्थापानांच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करू नये. लॉकडाऊन संपल्यानंतर फी जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु तरीही शहरातील काही शाळांनी वार्षिक फी मध्ये वाढ करून आदेशांच उल्लंघन केल्याचं दिसून येत असल्याने शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

पालकांच्या सोयीच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मधील लॉक डाऊन कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी वार्षिक फीस एकदाच न घेता मासिक किवा त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय द्यावा असं शासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु आता या वार्षिक फी मध्येच वाढ केल्याने पालकांच्या अडचणीत अजून भर पडल्याचे दिसून येतय..!