नाशिक शहरात शनिवारी अजून पाच पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): शहरात शनिवारी (दि. ३० मे २०२०) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात वृंदावन नगर, सातपूर-2, ड्रीम कॅसल, मखमलाबाद रोड परिसर-1, रिलायन्स पेट्रोल पंप, दिंडोरी रोड परिसर-1, चरणपादुका रस्ता, पंचवटी-1 यांचा समावेश आहे.

वृंदावन नगर गार्डन,सातपूर परिसरातील ४३ वर्षीय व्यक्ती व त्याची ३७ वर्षीय पत्नी या दोघांना घसा,  दुखणे आदी त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात दिनांक २८ मे २०२० रोजी दाखल झाले होते त्यांचे घश्याचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सायली निवास, राधानगर,ड्रीम कॅस्टल, मखमलाबाद रोड येथील २० वर्षीय युवकाला सर्दी-पडशाचा त्रास होत असल्याने त्यांचे नमुने घेण्यात आले होते ते कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्यावर तपोवन येथील कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत.

रिलायन्स पेट्रोल पंप दिंडोरी रोड समोरील प्रयाग ग्रीन सोसायटी येथील २९ वर्षीय रहिवासी हे जळगावहुन प्रवास करून नाशिकला आले त्यांना ताप व सर्दी असल्याने तपासणी केली गेली. त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असता त्यांचा अहवाल कोरोनाबाधीत आला आहे.

चरण पादुका रस्ता, पंचवटी,२८ वर्षीय तरुण ताप, खोकल्याच्या तक्रार असल्याने त्याचे नमुने घेण्यात आले ते पॉझिटिव्ह आले आहेत. या युवकाचे वडील ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.