या कारणामुळे सराफ बाजार बंदचा निर्णय मागे

नाशिक (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून “सराफ बाजारात अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे सराफ बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” असा चुकीचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने सराफ बाजार बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नाशिक सराफ असोसिएशनने मंगळवार (दि.८) पासून आठ दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मागील काही दिवसांपासून गैरसमज पसरवणारे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने सराफ बाजार बंद चा निर्णय मागे घेण्यात आला असून बुधवारपासून (दि.८) सराफ बाजार पूर्ववत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.