नाशिक शहरात गुरुवारी (दि. ११ जून) १९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. ११ जून२०२०) रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गुरुवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालात आढळलेल्या रुग्णांमध्ये: समर्थ नगर -३, फुले नगर- १, पंचवटी-४, कालीकानगर (पंचवटी)-२, खर्जुल मळा-१, इंदिरानगर-१, रेणुका नगर-१, हिरावाडी-१, भराडवाडी-५ यांचा समावेश आहे.

यापैकी आढळून आलेल्या काही कोरोनाबाधीतांची हिस्ट्री:

फ्लॅट क्र.०६, ठाकरे बंगल्यासमोर येथील वृद्ध महिला ४ जून २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाली होती त्या महिलेचे ११ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

बी-१२,शर्मिला अपार्टमेंट,गंगापुर रोड,एच.पी.टी कॉलेज जवळ  येथील ५५ वर्षीय व्यक्ती ५ जून २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाली होती.त्यांचा अहवाल  पॉझिटिव्ह आलेला असून  त्यांचे दिनांक ११ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

व्यंकटेश आशिष अपार्टमेंट,वृंदावन कॉलनी वैद्य नगर येथील ६१ वर्षीय वृद्ध कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

गीतांजली नगर ,मुंबई आग्रा रोड येथील ४१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

तिआरा अपार्टमेंट, केळकर हॉस्पिटल समोर, गायकवाड नगर येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.