नाशिक शहरात अजून दोन पॉझिटिव्ह रुग्ण !

नाशिक(प्रतिनिधी): शनिवारी (दि २३ मे २०२०) दुपारी दीड वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एक कॉलेजरोडच्या निर्माण व्हिला येथील ५१ वर्षीय पुरुष आणि सिडकोतल्या राणा प्रताप चौक येथील ३४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्रीच शहरात ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यापासून शहरातली संख्या ही दिवसेंदिवस वाढताच चालली आहे.