शहरात बुधवारी (दि.10 जून) रात्री उशिरा अजून 16 कोरोनाबाधित; दिवसभरात 28 रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): शहरात बुधवारी (दि. १० जून २०२०) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता दिवसभरातील कोरोनाबाधीतांची संख्या २८ झाली आहे.

बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात आढळलेल्या रुग्णांमध्ये: भाभा नगर-३, विडी कामगार नगर (अमृतधाम)-१, सुभाषरोड (नाशिकरोड)-१, काझी गल्ली (शितालामाता मंदिराजवळ)-२, सारडा सर्कल-१, महाराणा प्रताप चौक (दिंडोरी रोड)-१, फुले नगर (पेठ रोड)-२, गुलमोहर नगर (दिंडोरी रोड)-४, पेठ रोड (दत्त नगर)-१ यांचा समावेश आहे.

याआधी आढळून आलेल्या काही कोरोनाबाधीतांची हिस्ट्री:

जुने नाशिक, नाईकवाडी पुरा,अजमेरी चौक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याच परिसरातील व्यक्तीच्या संपर्कातील असून त्यांचे दि. ७ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

जुने नाशिक, नाईकवाडी पुरा येथील ३६ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाभा नगर, मुंबई नाका येथील ५० वर्षीय व्यक्ती व त्याच कुटुंबातील २२ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

सुभाष रोड, नाशिक रोड येथील ४५ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर बिटको हॉस्पिटल कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

नारायण नगर,अशोका मार्ग येथील ६४ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.