नाशिक शहरात गुरुवारी (दि. 9 जुलै) 117 कोरोनाबाधितांची नोंद; 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी दिवसभरात (दि. ९ जुलै) ११७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २७७ एकूण कोरोना रुग्ण:-३५९५ एकूण मृत्यू:-१४९ (आजचे मृत्यू ०४)  घरी सोडलेले रुग्ण :- १९६४ उपचार घेत असलेले रुग्ण:- १४८२ अशी संख्या झाली आहे.

गुरुवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधीतांच्या परिसरनिहाय माहितीसाठी इथे क्लिक करून फाईल डाऊनलोड करा. या फाईलमध्ये एकूण १८७ रुग्णांची माहिती आहे, जी गेल्या २४ तासातली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती- १)सिडको,नाशिक येथील ५२ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. २) महाराणा चौक, सिडको नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) कुंभारवाडा,नाशिक येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) दसक स्टॉप, सद्गुरू मंगल कार्यालय, जेलरोड ,नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे