नाशिक शहरात बुधवारी (दि. 8 जुलै) 221 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. ८ जुलै) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एकूण १५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २५२ एकूण कोरोना रुग्ण:-३४७८ एकूण मृत्यू:-१४५ (आजचे मृत्यू ०२) घरी सोडलेले रुग्ण :- १७२५ उपचार घेत असलेले रुग्ण:- १६०८ (टीप:-रुग्ण २३५ सदरची आकडेवारी २४ तासाची आहे)

कोरोनाबाधितांच्या परिसरनिहाय यादीसाठी इथे क्लिक करा. या यादीत २३५ लोकांची माहिती आहे, जी गेल्या २४ तासातली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती– १)हरी मंजिल,कथडा येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.२) शिवनेरी चौक, सिडको नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.