नाशिक शहरात बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) ४७८ कोरोना पॉझिटिव्ह; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) ४७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १६८७, एकूण कोरोना  रुग्ण:-५५,५५५, एकूण मृत्यू:-७८८ (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :- ५०,४२६, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४३४१ अशी संख्या झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) आगर टाकळी रोड, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) रूम नंबर ५, साई श्रद्धा, गोकुळ पार्क, पाथर्डी नगर,पाथर्डी फाटा नाशिक येथील ४४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) १२,मन्नत अपार्टमेंट, खोडे नगर, नाशिक येथील ४१ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ४) ३-८ विंग,कृष्णकुंज अयोध्या नगर, उपनगर नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) सातपूर, नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा