नाशिक शहरात मंगळवारी (दि. 7 जुलै) 99 कोरोनाबाधित रुग्ण; 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात मंगळवारी (दि.७ जुलै) एकूण ९९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २१६ एकूण कोरोना रुग्ण:-३१७३ एकूण मृत्यू:-१४३ (आजचे मृत्यू ०६)  घरी सोडलेले रुग्ण :- १६०६ उपचार घेत असलेले रुग्ण:- १४२४ अशी एकंदर संख्या झाली आहे.

तर मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती- १) हशमत मंजिल, नासिक रोड येथील ५४ वर्षीय महिला यांचे दि.०६ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. २)तारवाला नगर, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष यांचे दि.०६ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ३) सुपुष्प बंगला,दत्तमंदिर रोड, देवळाली गाव, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दि.५ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ४) गंगोत्री अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिलेचे दि.०५ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ५) वरुण कृपा सोसायटी, मदिना चौक, नाशिक  येथील ७४ वर्षीय वृद्ध महिलेचे  दि.६ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ६)देवळाली गाव, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष यांचे दि.०७ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे.