नाशिक शहरात सोमवारी (६ जुलै) ८९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात ८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २१६ एकूण कोरोना रुग्ण:-३०७४ एकूण मृत्यू:-१३७(आजचे मृत्यू ०५)  घरी सोडलेले रुग्ण :- १४९३ उपचार घेत असलेले रुग्ण:- १४४४ अशी संख्या झाली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती- १)संत कबीर नगर येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष यांचे दि.०३ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. २) दिंडोरी रोड, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष यांचे दि.०६ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ३) काझीपुरा पोलीस चौकी जवळ येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दि.५ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ४)जैन सिटी कॉलेज जवळ, वडाळा, नाशिक येथील ५२ वर्षीय वृद्ध महिलेचे दि.०५ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ५)ओढा रोड, नाशिकरोड, रेल्वे लाईन जवळ येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दिनांक २९ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.