नाशिक शहरात गुरुवारी (दि.६ ऑगस्ट) कोरोनामुळे तब्बल २२ मृत्यू; 465 जण कोरोना पॉझिटिव्ह !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट २०२०) कोरोनामुळे तब्बल २२ मृत्यू झाले आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा हा आतापर्यंतचा एका दिवसातला उच्चांक आहे. तर एकूण ४६५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता नाशिक शहरात आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७८५ एकूण कोरोना  रुग्ण:-१२५०४ एकूण मृत्यू:-३३३(आजचे मृत्यू २२) घरी सोडलेले रुग्ण :- ८८९८ उपचार घेत असलेले रुग्ण:- ३२७३ अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरातील कोरोनाबाधीतांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २२ रुग्णांची माहिती: १) मराठा कॉलेज जवळ, उत्तम नगर, सिडको येथील ५१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) नाशिकरोड, नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध महिलेची निधन झालेले आहे. ३) गीताई मयूर कॉलनी, कॅनॉल रोड, जेलरोड,नाशिक रोड येथील  ७९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) साई सोसायटी, अशोक नगर, सातपूर येथील ७३ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ५) उदयनगर, मखमलाबाद रोड,नाशिक येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६)शिवकृपा नगर, हिरावाडी, नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) वास्तू पार्क, सिडको येथील  ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८)नाशिक येथील ५१ वर्षीय   पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९)पराग अपार्टमेंट, आनंदनगर येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) सरदार चौक पंचवटी येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ११)म्हसरूळ,नाशिक येथील ४० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १२) अँपेक्स वेलनेस हॉस्पिटल, गोविंद नगर नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १३) घर नंबर २१६० तिवंधा चौक, नावदरवाजा,नाशिक येथील ६८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १४) काझीपुरा चौक, नाशिक येथील ३७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १५) उर्दु शाळे मागे, नाशिकरोड येथील ६२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १६) तारवाला नगर,म्हसरूळ,नाशिक  येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १७) सातपूर, नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १८) आमी आनंद अपार्टमेंट,महाजन नगर नाशिक येथील ८० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १९) लोकमान्य नगर, सिडको, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २०) पाण्याच्या टाकीजवळ, जानकी निवास, महात्मा नगर नाशिक येथील ६७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २१) जोशी वाडा, मारुती मंदिरासमोर हिरावाडी, पंचवटी नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २२) रेणुका नगर नाशिक येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.