नाशिक शहरात शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) ७२४ कोरोना पॉझिटिव्ह; ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) ७२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १५४१, एकूण कोरोना  रुग्ण:-२९,२८५, एकूण मृत्यू:-५१८ (आजचे मृत्यू ०४), घरी सोडलेले रुग्ण :- २४,३३९, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४४२८ अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) इंदिरानगर, नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) फ्लॅट क्र. ७, सागर अपार्टमेंट, टाकळीरोड,द्वारका येथील ५४ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) यशोदानगर मेहेर धाम,पेठरोड, नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) १६,वसंत अपार्टमेंट सुकेणकर लेन,पंचवटी येथील ६९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.