नाशिक शहरात गुरुवारी 4 जून रात्री उशिरा 12 कोरोनाबाधित रुग्ण !

नाशिक (प्रतिनिधी): शहरात गुरुवारी (दि. ४ जून २०२०) रात्री साडे आठ वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण कोरोना रुग्ण:-२८८ एकूण मृत्यू:- १२ घरी सोडलेले रुग्ण :- १०७ उपचार घेत असलेले रुग्ण:- १६८ झाले आहेत. गुरुवारी आढळून आलेले रुग्ण शहरातील विविध भागातील आहेत.

पेठरोड पंचवटी येथील ४२ वर्षीय  व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

मालेगाव येथील ३५ वर्षीय पोलीस कर्मचारी याचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा प्राप्त झाला आहे.

दत्त मंदिर,त्रिमुर्ती नगर, हिरावाडी पंचवटी येथील ४६ वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

देवपूजा अपार्टमेंट, नामको हॉस्पिटल जवळ पेठरोड येथील ३० वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा प्राप्त झाला आहे.

बिडी कामगार नगर, पंचवटी येथील २५ वर्षीय व ५३ वर्षीय महिला व ६ वर्षीय बालकाचा अहवाल कोरोना बाधित अहवाल प्राप्त झाला आहे.

शिवशक्ती चौक,सिडको येथील ३५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दत्तनगर पंचवटी येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

चक्रधर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी टाकळी रोड येथील ६३ वर्षीय वृद्धाचा व २९ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा प्राप्त झाला आहे.

सागर कॅस्टल, पखाल रोड, द्वारका कॉर्नर येथील ३६ वर्षीय व्यक्तीचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.