नाशिक शहरात शनिवारी (दि. ४ जुलै) १९६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. ४ जुलै) प्राप्त झालेल्या अहवालानुसार १९६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १९८ एकूण कोरोना रुग्ण:-२७८० एकूण मृत्यू:-१२७(आजचे मृत्यू ०५)  घरी सोडलेले रुग्ण :- १२३९ उपचार घेत असलेले रुग्ण:- १४१४ अशी संख्या झाली आहे.

शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांच्या परिसरनिहाय यादी इथे क्लिक करून डाऊनलोड करा..

तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे:

मयत रुग्णांची माहिती-१) शक्ती नगर, हिरावाडी येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २)गुंजाळ बाबा नगर,हिरावाडी येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्ती दिनांक २४ जून २०२० रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.त्यांचे दिनांक ३० जून २०२० रोजी निधन झालेले आहे. ३) सिडको, नाशिक येथील ३५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ४) सुधाकर हाईट्स, मखमलाबाद रोड, स्वामी विवेकानंद नगर येथील ४० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५)नानावली, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.