नाशिक शहरात रविवारी 31 मे रोजी अजून 9 पॉझिटिव्ह रुग्ण; आतापर्यंतची एकूण संख्या 193

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. ३१ मे २०२०) दिवसभरात ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण शहराच्या विविध भागातील आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या १९३ इतकी झाली आहेत, तर उपचार घेत असलेले रुग्ण ११९, बरे झालेल्यांची संख्या ६६ आणि आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या ८ अशी झाली आहे.

जाणून घेऊ या आज आढळून आलेल्या रुग्णांची हिस्ट्री:

पंचशील नगर गंजमाळ येथील ३५ वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ड्रीम व्हॅली शिंगाडा तलाव, फायर ब्रिगेड समोरील ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे.

सिव्हिल हॉस्पिटल मालेगाव येथे कार्यरत असणाऱ्या ३२ वर्षीय हेल्थ वर्कर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ओम गुरुदेव नगर मखमलाबाद रोड येथील रुग्णाच्या संपर्कातील २१ वर्षीय व २३ वर्षीय युवक तसेच ४६ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

लेखानगर येथील रुग्णाच्या संपर्कातील ३२ वर्षीय व ३५ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.