नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.31 जुलै) 657 पॉझिटिव्ह; शहरात 574 तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३१ जुलै) एकूण ६५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण ७१, नाशिक शहर ५७४, मालेगाव ९, जिल्हा बाह्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ३ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात १, मालेगावमध्ये ० तर नाशिक ग्रामीणमध्ये २ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ४१० रुग्ण बरे झाले आहेत.

त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४४० एकूण कोरोना  रुग्ण:-९४११ एकूण मृत्यू:-२७६(आजचे मृत्यू ०१) घरी सोडलेले रुग्ण :- ७३०७ उपचार घेत असलेले रुग्ण:- १८२८ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात शुक्रवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

कोरोनामुळे नाशिक शहरात मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती- १) रुद्रा रेसिडेन्सी, बनारसी नगर, हिरावाडी, पंचवटी येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुषाचे निधन झालेले आहे.