नाशिक शहरात सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) ६४६ कोरोना पॉझिटिव्ह; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट २०२०) ६४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १२५७, एकूण कोरोना  रुग्ण:-२५,४५१, एकूण मृत्यू:-४९१ (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :- २०,७७३, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४१८७ अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) जेलरोड, नाशिकरोड येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) मनमोहन हाईटस, अशोकनगर, नाशिक येथील ९९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) चंद्रल हौसिंग सोसायटी, जाधव संकुल, अशोकनगर सातपूर येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) सातपूर, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ५) साई रेसिडेन्सी, तारवाला नगर, पंचवटी नाशिक येथील ५८ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.