नाशिक शहरात शुक्रवारी 99 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ३ जुलै) रोजी प्राप्त झालेल्या अहवालात एकूण ९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर एकूण ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १९८, एकूण कोरोना रुग्ण:-२४९४, एकूण मृत्यू:-१२२, घरी सोडलेले रुग्ण :- १२१२, उपचार घेत असलेले रुग्ण:- ११६० अशी संख्या झाली आहे.

एकूण ५३४ नमुने तपासण्यात आले त्यात ३२४ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. तर शुक्रवारी एकूण ४१८ संशयित रुग्ण (ज्यांना ताप खोकला आहेत असे) उपचारासाठी दाखल झाले आहेत.

मयत रुग्णांची माहिती- १) वडाळा रोड, नाशिक येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे दि.२ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. २) नाशिकरोड येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे दि.१ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ३)वडाळा नाका येथील ५३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दि.१ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ४) सिडिओ मेरी कॉलनी येथील २४ वर्षीय महिलेचे दि.१ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ५)गंगोत्री अपार्टमेंट, इंद्रकुंड पंचवटी येथील ७७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दि.२ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ६)राजवाडा नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे दि.३ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ७)पटेल रोड, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे दि.३ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ८)गोपाळ नगर,अमृतधाम येथील ५५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दि.३ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ९)इंदिरानगर येथील ५० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दि.१ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे.