नाशिक शहरात मंगळवारी (दि.२९ सप्टेंबर) ५१४ कोरोना पॉझिटिव्ह; ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि.२९ सप्टेंबर) ५१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १९१२, एकूण कोरोना  रुग्ण:-५०,७००, एकूण मृत्यू:-७३३ (आजचे मृत्यू ०७), घरी सोडलेले रुग्ण :- ४६,६०४, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३३६२ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) सिडको नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) सातभाई नगर, जेलरोड, नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) अवधूत वाडी, दिंडोरी रोड, नाशिक येथील ३३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) रामवाडी, पंचवटी येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) मानस  रेसिडन्सी, श्रद्धा कॉलनी, नर्सिंग कॉलेज जवळ,नाशिक येथील ४६ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) निशांत प्राईड, गंगापूर रोड ,आनंद नगर, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ७)आडगाव नाका,नाशिक  येथील ८५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.