नाशिक शहरात रविवारी (दि. २७ सप्टेंबर) ७२६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; १२ जणांचा क्रोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. २७ सप्टेंबर) ७२६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १२ जणांचा क्रोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २०७६, एकूण कोरोना  रुग्ण:-४९,५०४, एकूण मृत्यू:-७१६ (आजचे मृत्यू १२), घरी सोडलेले रुग्ण :- ४५,७४९, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३०३९ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) शुभम पार्क, उत्तम नगर, अंबड येथील ७९ वर्षीय  वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) फ्लॅट क्रमांक ७, तेजस अपार्टमेंट, गणेश नगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) सिडको, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) सिन्नर फाटा, नाशिक रोड येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) द्वारका, नाशिक येथील २७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) संजय नगर, पंचवटी येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) अशियाना ग्लोरी सोसायटी ,काळे नगर, जेलरोड नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ८) तुळजा माता किराणा,चेहडी बुद्रुक, नाशिकरोड येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) विहीत गांव, नाशिक येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) रविवार पेठ,घनकर लेन, नाशिक येथील ६२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ११ )मुरलीधर  सोसायटी,वसंत विहार, मॉडेल कॉलनी, जेलरोड नाशिक येथील ४८ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. १२) सरदार चौक, पंचवटी नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.