नाशिक शहरात शनिवारी (दि. २५ जुलै) ५१९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. २५ जुलै) ५१९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २६६, एकूण कोरोना रुग्ण:- ७५०५, एकूण मृत्यू:-२४५(आजचे मृत्यू ११), घरी सोडलेले रुग्ण :- ५४४३, उपचार घेत असलेले रुग्ण:- १८१७ अशी संख्या झाली आहे. तसेच आज जवळपास ७४७ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

बातमी प्रसिद्ध करेपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त झाली नव्हती…

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) वडाळा, नाशिक येथील ५८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) बिडी कामगार नगर, अमृतधाम येथील ६९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) पंचवटी,नाशिक येथील ४७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) सारडा सर्कल, नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) मेहबूब नगर, वडाळागांव, नाशिक येथील ५१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) सिडको, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) कुंभारवाडा,जुने नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) हरिधाम अपार्टमेंट, देवळाली गाव, नाशिक  येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) हेरंब हौसिंग सोसायटी, कानिफनाथ नगर, नाशिक येथील ५६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. १०) गुलमोहर नगर, दिंडोरी रोड,नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.११) तलाठी कॉलनी मागे, शिवनगर,दिंडोरी रोड नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झालेले आहे.