धक्कादायक: नाशिक शहरात बुधवारी (24 जून) तब्बल 168 कोरोनाबाधित रुग्णांची विक्रमी नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (24 जून) तब्बल १६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधीतांच्या संख्येनं आज हा नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे नाशिक मनपा कार्यक्षेत्रात आतापर्यंतच्या कोरोनाबाधीतांची संख्या १४७४, पूर्णपणे बरे झालेले रुग्ण: ५८४, एकूण मृत्यू: ७७ तर एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ८१३ वर जाऊन पोहोचली आहे.