नाशिक शहरात शुक्रवारी (दि.24 जुलै) 193 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात शुक्रवारी (दि. २४ जुलै) दिवसभरात १९३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २६६, एकूण कोरोना रुग्ण:-६९८६, एकूण मृत्यू:-२३४ (आजचे मृत्यू ०४), घरी सोडलेले रुग्ण :- ५१०७, उपचार घेत असलेले रुग्ण:- १६४५ अशी संख्या झाली आहे.

सादर बातमी प्रसिद्ध करेपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्रशासनाकडून प्राप्त झालेली नव्हती.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) महाराणा प्रताप चौक,सिडको,नाशिक  येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) देवळाली कॅम्प, नाशिकरोड येथील ७८ वर्षीय वृद्ध  पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) सरगम सोसायटी, रामवाडी,पंचवटी येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) खर्जुल मळा नाशिकरोड, नाशिक  येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.