नाशिक शहरात रविवारी (दि. २३ ऑगस्ट) ३६२ कोरोना पॉझिटिव्ह; ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. २३ ऑगस्ट) ३६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १०८९ एकूण कोरोना  रुग्ण:-२०,०७४ एकूण मृत्यू:-४२९ (आजचे मृत्यू ०३) घरी सोडलेले रुग्ण :- १६,८९३ उपचार घेत असलेले रुग्ण:- २७५२ अशी संख्या झाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) गोकुळ वाटिका, हिरावाडी, पंचवटी येथील ७५ वर्षीय वृध्द महिलेचे निधन झालेले आहे. २) सप्तशृंगी देवी मंदिरा समोर, हनुमान चौक, सिडको येथील ५९ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३) साईबाबा नगर, चौथी स्कीम,सिडको नाशिक येथील ५९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.