नाशिक शहरात सोमवारी (दि. 22 जून) 85 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; सहा जणांचा मृत्यू

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोनाबाधीतांचा आलेख वाढतोच आहे. सोमवारी (दि. २२ जून २०२०) नाशिक शहरात तब्बल ८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे आता आत्तापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र- १६४,एकूण कोरोना रुग्ण-१२९४, एकूण मृत्यू-६८ (आजचे मृत्यू-०६), घरी सोडलेले रुग्ण:- ५३३ आणि उपचार घेत असलेले रुग्ण:- ६९३ अशी संख्या झाली आहे.

मयत रुग्णांची माहिती:

मनोहर गार्डन नाशिक येथील ४० वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.

फकीर वाडी, हाजी अली मज्जिद,जुने नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुषाचे निधन झालेले आहे.

१२, हरी वंदन सोसायटी, उपनगर नाशिक येथील ६६ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

जुने नाशिक येथील  ६९ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

घर नंबर २७८८ ,कोकणीपुरा, नाशिक येथील ८७ वर्षीय वृद्ध पुरुषाचे निधन झालेले आहे.

कालिदास कला मंदिर, नाशिक परिसरातील ५९ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.