नाशिक शहरात गुरुवारी (दि. २ जुलै) ६१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ६ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात गुरुवारी (जुलै) दिवसभरात एकूण ६१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १९८, एकूण कोरोना रुग्ण:-२३७१, एकूण मृत्यू:-११३(आजचे मृत्यू ०६), घरी सोडलेले रुग्ण:– १११२, उपचार घेत असलेले रुग्ण:- ११४६ अशी संख्या झाली आहे. शहरातील काही मोजके भाग सोडता जवळपास संपूर्ण शहरात आता कोरोनाने शिरकाव केला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे:
१)गणेशवाडी, देवी मंदिर येथील ५० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती दि.२९ जून २०२० रोजी रुग्णालयात दाखल झाले होते उपचार सुरू असताना त्याच दिवशी त्यांचे निधन झालेले आहे. २) काझीपुरा, विठ्ठल मंदिर,जुने नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती दि.२८ जून २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाले होते उपचार सुरू असताना दि.१ जुलै २०२० रोजी त्यांचे निधन झालेले आहे. ३) दिंडोरी रोड, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती दि.२४ जून २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाले होते.उपचार सुरू असताना दि.१ जुलै २०२० रोजी त्यांचे निधन झालेले आहे. ४)पंचवटी नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती दि.२४ जून २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाले होते उपचार सुरू असताना दि.१ जुलै २०२० रोजी त्यांचे निधन झालेले आहे. ५)नानावली ,द्वारका, नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्ती दि.२९ जून २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाले होते उपचार सुरू असताना दि.२ जुलै २०२० रोजी त्यांचे निधन झालेले आहे. ६)आनंद नगर, सिडको येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.