नाशिक शहरात शनिवारी (दि.18 जुलै) 171 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि.१८ जुलै) १७१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २५६ एकूण कोरोना रुग्ण:-५४४४ एकूण मृत्यू:-२०२ (आजचे मृत्यू ०८) , घरी सोडलेले रुग्ण :- ३५७५ , उपचार घेत असलेले रुग्ण:- १६६७ अशी संख्या झाली आहे.

शनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या परिसरनिहाय यादीसाठी इथे क्लिक करा..

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) जुनी तांबट लेन, संत गाडगेबाबा पतसंस्थेचे समोर नाशिक येथील ५९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २)पंचवटी, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) ४७,विजय निवास, कालिका पार्क, उंटवाडी, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ४) शामस्तव रो हाऊस, विखे पाटील नगर,नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) देवळाली गाव, नाशिकरोड येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) म्हसरूळ, नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) लोखंडे मळा, कॅनॉल रोड नाशिक येथील ५७ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ८) पाथर्डी शिवार, नाशिक येथील ३१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.