नाशिक शहरात गुरुवारी (दि.16 जुलै) 163 कोरोनाबाधितांची नोंद; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि.१६ जुलै) १६३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २७४, एकूण कोरोना रुग्ण:-४८३४, एकूण मृत्यू:-१९३ (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण:- ३०९४, उपचार घेत असलेले रुग्ण:- १५४७ अशी संख्या झाली आहे.

गुरुवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची परिसरनिहाय यादी प्राप्त इथे क्लिक करून डाउनलोड करा. (टीप: सदरची यादी ही गेल्या २४ तासातील आहे.)

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या: शांती पार्क, श्रीमान अपार्टमेंट, नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.२) जेलरोड, सैलानी बाबा रोड, तोरा मंडल सोसायटी, येथील ५५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.३)पाचवी स्कीम, सिडको, उत्तम नगर,नाशिक येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.४)महात्मा नगर नाशिक येथील ९४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.५)फ्लॅट क्रमांक १३,मदिना हौसिंग सोसायटी, नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.