नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सात जणांची हिस्ट्री व माहिती

नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (दि. १५ जून २०२०) एकूण ६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण कोरोना रुग्ण:-७३८, एकूण मृत्यू:- ३९,घरी सोडलेले रुग्ण:- २५९, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४४ अशी संख्या झाली आहे. शहरात अजून ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, जाणून घेऊ त्यांची हिस्ट्री व माहिती.

आवास व्हीला, खोडे नगर येथील आणि ८० वर्षीय वृद्ध पुरुष यांचे ४ जून २०२० रोजी कोरोना बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दिनांक १४ जून २०२० रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे.

महादेव वाडी सातपूर येथील ६० वर्षीय पुरुष व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे अहवाल दिनांक १४ जून २०२०  प्राप्त झाला होता.त्यांचे त्याच दिवशी दिनांक १४ जून २०२० रोजी मृत्यू झाला आहे.

मुरुड गल्ली, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल दिनांक १४ जून २०२० रोजी प्राप्त झाला होता उपचार सुरू असताना दिनांक १५ जून २०२० त्यांचा मृत्यू झाला आहे.

पारिजात नगर येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती ही कोरोना बाधित असल्याचा अहवाल दिनांक १५ जून २०२० रोजी प्राप्त झाला त्यांचा १५ जून २०२० रोजी मृत्यू झाला आहे

खडकाळी, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल दिनांक १४ जून २०२० रोजी प्राप्त झाला होता त्यांचा दिनांक १४ जून २०२० रोजी मृत्यू झाला आहे.

वडाळा गाव नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल दिनांक १४ जून २०२० रोजी प्राप्त झाला होता त्यांचा १४ जून २०२० रोजी मृत्यू झाला आहे.

काद्री चौक, अजमेरी मस्जिद, नाईकवाडी पुरा येथील ५२ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल दिनांक ७ जून २०२० रोजी प्राप्त झाला त्यांचे दिनांक १५ जून २०२० रोजी मृत्यू झाला आहे.