नाशिक शहरात बुधवारी (दि. १५ जुलै) २२४ कोरोनाबाधितांची नोंद; ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शहरात बुधवारी (दि. १५ जुलै) २२४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर तब्बल ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ३०० एकूण कोरोना रुग्ण:-४६६१ एकूण मृत्यू:-१८८ (आजचे मृत्यू ०७), घरी सोडलेले रुग्ण :- २९५६, उपचार घेत असलेले रुग्ण:- १५१७ अशी संख्या झाली आहे.

बुधवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची परिसरनिहाय यादी प्राप्त इथे क्लिक करून डाउनलोड करा.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) अंबड लिंक रोड, नाशिक येथील ४४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २)रेल्वे कॉलनी, सिन्नर फाटा नाशिक येथील ६० वर्षीय  वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) कोणार्क नगर, नाशिक येथील ८५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) गंगापूर रोड,नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) हनुमान वाडी समोर गणेश नगर, मखमलाबाद रोड,पंचवटी येथील ३९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६)तारवाला नगर, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.७)भाभा नगर, नाशिक येथील ७४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.