नाशिक शहरात रविवारी (दि. 14 जून) एकूण 60 कोरोनाबाधित; दहा लहान मुलांचा समावेश

नाशिक (प्रतिनिधी): शहरात रविवारी (दि. 14 जून) एकूण चार टप्प्यात अहवाल प्राप्त झाले आहेत. यात एकूण 60 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता हा नाशिक शहरातला कोरोनाबाधीतांचा नवीन उच्चांक आहे. या कोरोनाबाधीतांमध्ये एकूण 10 लहान मुलांचाही समावेश आहे. या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलतं याकडे नाशिककरांचं लक्ष आहे.

रविवारी सायंकाळी ६ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: नाईकवाडी-१. बिटको कॉलेजजवळ-१, इतर-१, फाळके रोड-१ अशा एकूण ४ रुग्णांचा समावेश आहे.

रविवारी सायंकाळी ७.१५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: कामटवाडे-१, वडाळागाव-२, हिरावाडी-१, पखाल रोड-१, भाभा नगर-१, गंगापूर रोड-१, पाथर्डी फाटा-१ अशा एकूण ८ रुग्णांचा समावेश आहे.

रविवारी सायंकाळी ७.३५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: हिरावाडी-२, त्रिमूर्ती नगर-३, कथडा (जुने नाशिक)-१, गोसावी नगर-१, पोलीस हेडक्वार्टर-३, नाईकवाडीपुरा-१, शिवाजी नगर-१, वडाळा रोड-१, हिरावाडी-१, उत्तमनगर (सिडको)-१, बागवानपुरा-१, वडाळा नाका-७, पखाल रोड-३, पेठ रोड-५ अशा एकूण ३१ रुग्णांचा समावेश आहे.

तर रविवारी सायंकाळी ८.२० वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: नाशिकरोड-१, इंदिरानगर-१, वडाळागाव-१, भारतनगर-१, सातपूर-१, महाराणा प्रताप चौक-१, जुने नाशिक-३, खडकाळी-१, मखमलाबाद रोड-१, कथडा (जुने नाशिक)-१, आडगाव(मेन रोड)-१, हमालपुरा (जुने नाशिक)-१, लाम रोड (नाशिकरोड)-१, पेठकर प्लाझा (पंचवटी)-१, आझाद चौक-१ अशा एकूण १७ रुग्णांचा समावेश आहे.