नाशिक शहरात सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) २८० कोरोना पॉझिटिव्ह; ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) २८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १३३३, एकूण कोरोना  रुग्ण:-५७,४५८, एकूण मृत्यू:-८१४ (आजचे मृत्यू ०४), घरी सोडलेले रुग्ण :-५३,१०५, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३५३९ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) ८४४, रामसेतु पुला जवळ,गंगाघाट,पंचवटी येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) हर्षवर्धन सोसायटी, मखमलाबाद नाका,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) स्वस्तिक बिल्डिंग फ्लॅट क्र.२२ बापू बंगला, इंदिरानगर नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) सावता नगर,नाशिक येथील ३२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.