नाशिक शहरात शुक्रवारी (दि. 10 जुलै) 167 कोरोनाबाधितांची नोंद; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १० जुलै) १६७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २७० एकूण कोरोना रुग्ण:-३७६२ एकूण मृत्यू:-१५४ (आजचे मृत्यू ०५)  घरी सोडलेले रुग्ण :- २१२५ उपचार घेत असलेले रुग्ण:- १४८३ अशी संख्या झाली आहे.

शुक्रवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची परिसरनिहाय यादी प्राप्त इथे क्लिक करून डाउनलोड करा. (टीप:-रुग्ण १२५ सदरची आकडेवारी २४ तासाची आहे)

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) पंचवटी, नाशिक येथील ८९ वर्षीय  वृद्ध पुरुषाचे निधन झालेले आहे. २) तक्षशिला शाळेजवळ, मालधक्का रोड, देवळाली गाव, नाशिक रोड येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३ )दखनीपुरा, जुने नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.४)बागवान पुरा, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुषाचे निधन झालेले आहे. ५) वृंदावन संकुल,शांतीनगर ,मखमलाबाद रोड,नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.