नाशिक शहरात गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) ६४७ कोरोना पॉझिटिव्ह; ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) ६४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १९११, एकूण कोरोना  रुग्ण:-५२,११९, एकूण मृत्यू:-७४२ (आजचे मृत्यू ०४), घरी सोडलेले रुग्ण :- ४७,७७३, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३६०४ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) समर्थ द्वारका, त्रिकोणी गार्डन समोर,काठे गल्ली, द्वारका नाशिक येथील ८३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) प्लॉट क्र.४६,सिद्धि हनुमान मंदिर, अशोक नगर, नाशिक येथील ५६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३ )रविवार कारंजा, नाशिक येथील ८६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) ४,साई पार्क अपार्टमेंट,जुना आग्रारोड, जनलक्ष्मी बँके मागे नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.