नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.१ ऑगस्ट) ६०३ पॉझिटिव्ह; शहरात ३९७ तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.१ ऑगस्ट) एकूण ६०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण १७८, नाशिक शहर ३९७, मालेगाव २८, जिल्हा बाह्य ० अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ६ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ६, मालेगावमध्ये ० तर नाशिक ग्रामीणमध्ये ० मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २१७ रुग्ण बरे झाले आहेत.

त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४९१ एकूण कोरोना  रुग्ण:-९८०८ एकूण मृत्यू:-२८२(आजचे मृत्यू ०६) घरी सोडलेले रुग्ण :- ७४४९ उपचार घेत असलेले रुग्ण:- २०७७ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात शनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

तर नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे: १) गजानन चौक, पंचवटी येथील ५५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. २) दत्तकृपा संकुल, आनंदवली, गंगापूर रोड येथील ७७ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३ )उत्तम नगर, नाशिक येथील ५० वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ४) स्वार बाबा नगर, सातपूर अशोकनगर येथील ४३  वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) जलाराम दर्शन सोसायटी, टाकळी गांधीनगर येथील ६९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) ऋषिप्रसाद हाईट केवल पार्क रोड नाशिक येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.