अनेक खासगी हॉस्पिटल्सला ऑक्सिजनचा तुटवडा; रुग्णांना इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरु

अनेक खासगी हॉस्पिटल्सला ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रुग्णांना इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरु

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये आज (दि. २४ एप्रिल) ऑक्सिजनचा तुटवडा भासायला लागला आहे. त्यामुळे काही खासगी हॉस्पिटल्सने रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून रुग्णांना इतरत्र हलविण्याची विनंती केली आहे. आता या परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये फोन करून ऑक्सिजन बेडची मागणी करत आहेत.

नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे डॉक्टर्स चिंतेत आहेत. प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णाला हवा तितका ऑक्सिजन कसा पुरवता येईल यासाठी आटापिटा करताय.. नुकत्याच नाशिकमध्ये दाखल झालेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसमुळे ऑक्सिजन मिळण्याचा अपेक्षा उंचावल्या असल्या तरीही मिळालेला तो ऑक्सिजन किती दिवस पुरेल याचीसुद्धा डॉक्टरांना चिंता आहे.